सुरगाणा तालुका : संकटकाळात गुरुजन धावले मदतीला
सुरगाणा : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिक्षकांनी सामाजिक वसा जपत तालुक्यात कोविड रुग्णांसाठी निधी म्हणून ४ लाख १८ हजार रुपये जमा करून मदतीचा हात पुढे केला आहे. लेकरांचे भविष्य पेरणाऱ्या शिक्षकांना भविष्यात उभे ठाकलेले संकटही कळले. म्हणूनच एकवटलेल्या शिक्षकांनी कोविड जननिधीस मदत करून नवा आदर्श घालून दिला आहे.
याचा लाभ अतिदुर्गम आदिवासी भागातील गुजरात सीमेलगतच्या रुग्णांना होत आहे. याची तालुक्यातील जनतेमध्ये चांगलीच चर्चा होत असून, गुरुजींनी ठरविले तर काहीच अशक्य नाही. कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोनाला हद्दपार करण्याचा शिक्षकांनी विडा उचलला असून शिक्षक रस्त्यावरील चौकीवर नाकाबंदी करीत चौकीदार, रखवालदाराची भूमिका बजावण्याबरोबरच लसीकरण ऑनलाइन नोंदणी, माझे कुटुंब, माझी जबाबदारीऐवजी तुमचे कुटुंब, माझी जबाबदारीचा विडा उचलत घरोघरी जाऊन आजारविषयक ताप, सर्दी, खोकला, खावटी सर्व्हे तसेच विविध आजारांबाबत आस्थेने, आपुलकीने चौकशी करीत आहेत. सेंटर मदतनीस लस घेण्याकरिता जनजागृती, ऑनलाइन शिक्षण अशा कितीतरी जबाबदाऱ्या शिक्षक आपला जीव मुठीत धरून पार पाडत आहेत.
या निधी संकलन कामी प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी मीना यांच्या मार्गदर्शनाने प्रकल्प स्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली. सुभाष बावा, बाळासाहेब देवरे, नसीर मणियार, लक्ष्मण गोसावी आदींची समिती स्थापन करून अवघ्या दोन दिवसांत अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या मुख्याध्यापकांकडे रुपये जमा केले. मुख्याध्यापकांनी निधी संकलन करणारे मुख्यध्यापक नसीर मणियार व लक्ष्मण गोसावी यांच्याकडे जमा केले. निधी संकलनाकरिता नेटबँकिंगच्या ऑनलाइन डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून विशेष परिश्रम घेऊन अवघ्या दोन - चार दिवसांत निधी संकलन केले. यात रवींद्र यवले, कैलास वाकचौरे, नीलेश खेरनार, वसंत आहेर, अनिल शिंदे, सी. के. झिरवाळ, हिरामण वाडु, राम नजन आदींची मदत केली.
-----------------
प्रकल्पातील अनुदानित, शासकीय आश्रम शाळा, गृहपाल, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल, माझ्या आवाहनास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
- विकास मीना, प्रकल्प अधिकारी
===Photopath===
150521\img-20210515-wa0036.jpg
===Caption===
फोटो- सुरगाणा तालुका कोविड 19 जन निधीची रक्कमेचा धनादेश तहसिलदार किशोर मराठे,यांच्या कडे सुपूर्द करतांना मुख्याध्यापक नसीर मणियार, लक्ष्मण गोसावी, श्रीम. व्ही. व्ही. पाटील,भगत ,आर आर.पवार, वाडेकर , लांडगे ,वसंत आहेर आदी..