नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली झाली आहे. रस्त्याच्या कामाची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा केली होती.सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात देखील केली. परंतू महिनाभराचा कालावधी घेत अडखळत या रस्त्याचे तात्पुरत्या स्वरु पात खड्डे बुजवत निकृष्ट दर्जाचे काम केले असून सदर काम बंद केले आहे. रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याचे डांबरीकरण होऊन दहा ते पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असून या रस्त्यावर संबंधित लोकप्रतिनीधींनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीच आश्वासने देत ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम करीत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. कामास सुरूवात करण्यापूर्वी या रस्त्याच्या कामासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये सकारात्मक विचार करत महत्वाची बैठक घेण्यात आली होती.या बैठिकत रस्त्याचे चांगल्या पद्धतीने काम करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. परंतू आता यापुढे काम होणार नाही असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.-------------------नांदुरवैद्य ते अस्वली या रस्त्याच्या कामासंबंधी अनेक अडचणीतुन मार्ग काढून रस्त्याचे काम सुरू केले. मात्र दोन कि.मी. काम आॅस्ट्रेलियन पद्धतीने केल्यानंतर एक कि.मी.साठी काम थांबविण्यात आले.जे खड्डे मशिनच्या साहाय्याने बुजविन्यात आलेले आहे ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांच्या बैठिकत सांगितल्याप्रमाणे काम झाले नसून तात्पुरत्या स्वरु पात खड्डे बुजवून काम बंद करण्यात आले आहे.- गणेश मुसळे, ग्रामस्थ.
अस्वली - नांदूरवैद्य रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 2:10 PM