नाशिक:कतार मधील दोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाले. महिलांच्या 10000 मीटर प्रकारात तिने हे यश मिळवले. याबद्दल सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला सैनिकी महाविद्यालयात संजीवनी व तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नितीनजी गर्गे, दिनेश नाईक, उन्मेष कुलकर्णी, जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, नितीन अहिरराव मंचावर उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरु वातीला यशस्वी खेळाडूंची स्वागत मिरवणूक प्रवेशद्वारापासून काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात संजीवनीचे महाविद्यालयात स्वागत केले.कु. संजीवनी जाधव हिने भावनाविवश होऊन मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाची श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेती विद्यार्थिनी मोनिका आथरे हिनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आभार प्रदर्शन निरंजन गायकवाड यांनी केले. (२९स्पोर्ट्स संजिवनी)
आशियाई चॅम्पियनशिप विजेती संजीवनी जाधव हिचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 4:55 PM
नाशिक: कतार मधील दोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाले.
ठळक मुद्दे विजेंद्र सिंग यांनी खेळाडूंना ज्या विविध अडचणींना तोंड द्यावे लागते त्याविषयी सांगितले तसेच अशा परिस्थितीतही चांगली कामिगरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.