जिल्ह्यातील एकूण घरगुती गॅसग्राहक - १५ लाख
गॅस वितरित करणाऱ्या एजन्सी - १७५
घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - ३०००
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - ०
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - ०
एकही डोस न घेणारे कर्मचारी - ३०००
चौकट-
३० डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह
कोरोनाच्या काळातही घरपोहोच गॅस सिलिंडर पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका असून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून सुमारे २५ ते ३० डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह झाले होते. औषधोपचाराने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी या काळात त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला.
कोट-
मी लस घेण्यासाठी गेलो होतो. पण वयात बसत नसल्याने मला लस मिळाली नाही. कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी मी दररोज काढा घेणे, दररोज वाफ घेणे असे उपाय करतो. सॅनिटायझरचा वेळच्या वेळी वापर करण्याच्या आम्हाला सूचना आहेत.
- सहदेव वाऱ्हे
कोट-
दोन वेळा नंबर लावूनही लस मिळाली नाही. पुन्हा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत काळजी घेणे एवढेच आमच्या हातात आहे. अद्याप कोरोनाची बाधा झालेली नाही. रोज संध्याकाळी वाफ घेण्याबरोबरच सकाळी काढा घेऊन प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करतो.
- शिवाजी वाबळे
चौकट-
हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना
गॅस सिलिंडर ग्राहकांना देताना आणि घेताना हात सॅनिटाईज करून घ्यावे, अशा सूचना एजन्सीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनीही सिलिंडर घरात घेताना त्यावर शक्यतो सॅनिटायझर मारू नये. कारण ते ज्वलनशील असल्याने काही धोका होरू नये यासाठी काळजी घ्यायला हवी.