संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व व्यापार व काही काळाकरिता उद्योग देखील बंद होते. या काळात उद्योजकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आयमाची संपूर्ण टीम उद्योजकांच्या सर्व प्रश्नांसाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभी असल्याचे आयमा अध्यक्ष वरूण तलवार व धनंजय बेळे यांनी सांगितले. हे सर्व करीत असताना अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सेवासुविधा सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आयमा पदाधिकाऱ्यांचा महापालिकेचे अधिकाऱ्यांकडे सातत्याने या सुविधांसाठी पाठपुरावा सुरू आहे. नुकतेच महापालिकेने शहरात डांबरीकरणाची कामे सुरू केल्यानंतर आयमा पदाधिकाऱ्यांनी त्वरित अंबड औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर असलेल्या ५ ते ६ कोटींच्या डांबरीकरणाच्या कामासाठी पाठपुरावा करून, डांबरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध ठिकाणी सुमारे ६ कोटी रुपयांच्या रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयमा अध्यक्ष वरूण तलवार, धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे, निखिल पांचाळ, ललित बुब, सुदर्शन डोंगरे, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे, राजेंद्र पानसरे, आशिष नहार, वैभव चावक, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, विराज गडकरी, विजय जोशी व मनपा अधिकारी उपस्थित होते.
(फोटो ०२ रोड) ओळी- अंबड औद्योगिक वसाहतीमधील रस्ता डांबरीकरणाची पाहणी करताना वरूण तलवार, धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे, निखिल पांचाळ, ललित बुब, सुदर्शन डोंगरे, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे, राजेंद्र पानसरे आदी