शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

माळरानावर पिकवली आकांक्षा काकडी

By admin | Published: January 16, 2017 1:04 AM

भरघोस उत्पन्न : खेडभैरव येथील शेतकऱ्याच्या कष्टाला यश

 लक्ष्मण सोनवणे  बेलगाव कुऱ्हेएकीकडे कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील अनियमतता असताना त्याच परिस्थितीत दुसरीकडे तालुक्यातील कैलास वाजे या खेडभैरव गावातील शेतकऱ्याने जिद्दीच्या बळावर दगडाळ, मुरमाट पडीक अन दुर्लक्षित असलेल्या माळरानावर एक एकरच्या शेतीत बंगलोर येथील नेत्रा सिड्सची संकरित आकांक्षा या सुधारित वाणाची लागवड करून आधुनिक पद्धतीने काकडीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. यामुळे दररोज साठ ते सत्तर या काकडीच्या जाळ्या नाशिकला विक्रीसाठी ते नेतात. यातून त्यांना दररोज उत्पन्नदेखील चांगले मिळत आहे. त्यांनी बेंगळुरू येथील नेत्रा सिड्सच्या मदतीने किरण मांडे यांनी आधुनिक शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले असून ते शेतीबद्दलचे उपयुक्त असे ज्ञान त्यांना देत आहेत.या प्रयोगामुळे त्यांना विक्रमी उत्पादन मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. शेतीविषयक अभ्यास करून स्वत:च्या पोटच्या मुलासारखी काकडीची काळजी घेत त्यांनी निसर्गाच्या चहूबाजूने येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. गेल्या काही वर्षाच्या कालखंडात निसर्गाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नसतानादेखील त्यांनी कोणत्याही बाबीची पर्वा न करता ड्रीप पद्धतीने काकडी जगविली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात नक्कीच असतो. याप्रमाणे नवीन प्रयोगात त्यांची पत्नी वंदनादेखील त्यांना सातत्याने मदत करीत असतात.इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभी असताना तालुक्यातील या शेतकऱ्याने खचून न जाता डबघाईला आलेली कौटुंबिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भाजीपाला शेतीचा नवा पर्याय निवडला. अनेक पारंपरिक पिकांचे काटेकोर नियोजन करत नवनवीन प्रयोग केले. त्यातून आर्थिक घडी बसवली. त्यांच्या या प्रयोगाला यश आले. त्यामुळे इतर शेतकरीही आता त्यांची बाग पाहण्यासाठी रांगा लावत आहेत. वाजे यांच्या कष्टाला मिळालेली ती पावतीच आहे!