इनामुल हक अब्दुल खालीक (६०) (रा. गोल्डननगर स. नं. १३२ प्लॉट) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी साद फैसल मोहियोद्दीन, उमर फैसल मोहिउद्दीन, असद फैसल मोहिउद्दीन,मुजादूल इस्लम राही, बुलैस बाहू, सलमान अबुलैस (सर्व रा. यासिन मशिदीजवळ मालेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. काल शनिवारी (दि.२३) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास ही हाणामारी झाली. फिर्यादी व आरोपी हे सख्खे नातेवाईक असून, बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यात हिस्सा वाटणीवरून वाद सुरू आहेत. आरोपींनी कुरापत काढून फिर्यादीच्या मुलांना मारहाण केली. लाकडी दांडक्याने दोघांचे डोके फोडले. शिवीगाळ दमदाटी केली होती. फिर्यादी त्याच्या मुलांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून आला असता, मालमत्तेचा वाटा का देत नाही, अशी कुरापत काढून साद फैजल याने हातातील तलवार डोक्यावर मारून डोके फोडले, तर इतरांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा दम दिला. या मारहाणी बाहेरील मंडळी जमवली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक भामरे करीत आहेत.
मालमत्तेच्या वादातून मारहाण; मालेगावी दंगलीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:16 AM