ठळक मुद्देशिवीगाळ करून मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : वर्गणीच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत छेड काढल्याचा खोटा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण मळा येथे राहणाऱ्या स्वाती विजय कालापाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुनील मासराम, विष्णू मेटके हे घरी आले. यावेळी ते वारंवार पैसे मागत होते. रात्रीच्या वेळी बैठकीला येण्यास नकार दिला. त्याचवेळी स्वाती यांचा भाऊ प्रशांत लोखंडे हा घरी भेटायला आला होता. त्याला सुनील मसराम, विष्णू मेटके यांनी त्याला अडविले व शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.