शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

श्रावणात प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:59 AM

त्र्यंबकेश्वर : संपूर्ण श्रावण महिना विशेषत: श्रावणी सोमवारी गर्दीचे प्रमाण मोठे असते. त्यातही तिस-या श्रावणी सोमवारी तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी प्रमाणे गर्दी असते. यासाठी शांतता व नियोजन करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

त्र्यंबकेश्वर : संपूर्ण श्रावण महिना विशेषत: श्रावणी सोमवारी गर्दीचे प्रमाण मोठे असते. त्यातही तिस-या श्रावणी सोमवारी तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी प्रमाणे गर्दी असते. यासाठी शांतता व नियोजन करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.श्रावणातील गर्दीच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी राहूल पाटील, पोलीस अधीक्षक आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसिलदार दीपक गिरासे, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, पेठ त्र्यंबक पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले, पोलीस निरीक्षक अनमुलवार, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिराची रांग उत्तर दरवाजातून रथाच्या बाजुने काढावी. संपूर्ण मंदीर परिसर मोकळा असावा.मंदिरात शेवाळ साचू देऊ नका. लोक घसरून पडणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मंदिरासमोर अ‍ॅब्युलन्स सज्ज ठेवावी. तसेच मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे आदेश त्यांनी वीज अभियंत्याला दिले.त्र्यंबकेश्वर मंदीर व कुशावर्त तीर्थ या ठिकाणी जीवरक्षक नेमावेत. सीसीटीव्ही बसवावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी दिल्या.श्रावण महिनाभर वीज जाणार नाही याची काळजी घ्यावी. वीज गायब होऊ देऊ नका, असे विद्युत अभियंता किशोर सरनाईक यांना सांगण्यात आले.त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रु ग्णालयात जादा वैद्यकीय अधिकारी जादा निर्संग स्टाफ व इतर स्टाफ तैनात असतात. पुरेशा व दर्जेदार औषधासह रु ग्णालयात व्यवस्था आहे. 50 खाटांचे हे रु ग्णालय आहे.नगरपालिकेने पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी.काही ठिकाणी पाईपलाईन चोकअप झाल्याने त्या तातडीने दुरु स्त कराव्या.यावेळी वन विभाग अधिका-यांनी ब्रम्हगिरी व गंगाद्वार वर चढताना अगर उतरताना स्वयंसेवकांची वन विभागाने व्यवस्था करावी. अशा सर्व विभागांना सूचना देऊन संपूर्ण श्रावण मास सुरक्षितपणे व शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.बैठकीला मुख्याधिकारी प्रवीण निकम, नगरसेवक समीर पाटणकर, दीपक गिते, त्रिवेणी तुंगार सोनवणे, अनिता बागुल, शांताराम बागुल, मधुकर लांडे, विष्णू दोबाडे ,शीतल उगले, सायली शिखरे, माधवी भुजंग, मंगला आराधी, कल्पना लहांगे, भारती बदादे, संगीता बदादे, शिल्पा रामायणे आदी उपस्थित होते.लोकशाहीचा पाया सशक्त करा : स्वामीनाशिक : देशाच्या जडणघडणीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण असते आणि आगामी काळात तर तरुणांची भूमिका मोलाची ठरणार आहे. तरुणांचा देश अशी ओळख असल्याने जगाचे लक्ष भारताकडे आहे. याच तरुणांच्या खांद्यावर लोकशाहीचा पाय समृद्ध करण्याची जबाबादारी आहे, असे प्रतिपादन उपायुक्त दिलीप स्वामी यांनी केले.सी.एम.सी.एस. महाविद्यालय येथे आयोजित ‘मतदार जागृती’ कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरु ण आनंदकर, तहसीलदार अनिल दौंडे, प्राचार्य डॉ. सी. एन. शिंदे, नायब तहसीलदार सविता पठारे, सुनील देशमुख उपस्थित होते.यावेळी स्वामी म्हणाले, देशसेवेसाठी प्रत्येक तरु णाने मतदानप्रक्रि येत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे. मतदार यादीत आपले नाव येणे हादेखील उत्सवाचा क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर म्हणाले, लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजविणे आवश्यक आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशाची मान उंचविण्यासाठी प्रत्येक तरु णाने मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी निवडणूक शाखेने नागरिक व मतदार यांच्यासाठी तयार केलेल्या निवडणूक-२०१९ चे प्रश्नावलीचे वाटप करण्यात आले. सेंट जोसेफ किलबिल शाळेततही निवडणूक-२०१९चे प्रश्नावलीचे वाटप करण्यात आले.वैद्यकीय पथके तैनात करण्याचे आवाहनअन्न व औषध प्रशासनाने हॉटेल व टपरी व्यावसायिक यांच्या जवळील पाणी,पदार्थ यांची तपासणी करावी. शहरातील रु ग्णालयाने वैद्यकीय पथक मंदीराबाहेर मंदीरात कुशावर्तावर तसेच दोन्ही पहाडांच्या पायथ्याशी ठेवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. यावर मिटींगला आलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.भागवत लोंढे म्हणाले वरील सर्व ठिकाणी वैद्यकीय पथके असतातच या व्यतिरिक्त टेंपररी वाहन तळावर देखील वैद्यकीय पथके असतात.