नाशिक : मालेगाव-कळवण रस्त्यावर देवळा तालुक्यात गेल्या २८ जानेवारी रोजी झालेल्या बस आणि रिक्षा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बसमधील प्रवाशांच्या वारसांच्या खात्यावर प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. रिक्षातील मयत नऊ प्रवाशांनादेखील विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. मयतांच्या वारसांना तत्काळ मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.देवळा तालुक्यात विहिरीत बस पडून झालेल्या विचित्र अपघातात एकूण २६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अत्यंत भयानक अशा या अपघातात बसमधील चालकासह १६ प्रवासी आणि रिक्षामधील नऊ प्रवाशांना जीव गमवावा लागला. एस.टी.च्या हतिहासातील हा सर्वात मोठा अपघात असल्याने राज्य तसेच केंद्र शासनानेदेखील मदतीसाठीची तत्परता दाखविली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी बसमधील मयतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख आणि जखमींना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली होती, तर विशेष बाब म्हणून रिक्षामधील मयत प्रवाशांनादेखील प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती.मंत्रिमहोदयांच्या घोषणेनंतर मयतांच्या वारसांना तत्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील प्रयत्न सुरू होते. राज्य परिवहन महामंडळालादेखील पत्रव्यवहार करण्यात आला. नाशिक विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी याप्रकरणी युद्धपातळीवर प्रकरणाची पूर्तता केल्याने बसमधील वारसांना दहा लाखांची मदत प्राप्त झाली आहे. बसमधील मयत १६ प्रवाशांपैकी १४ वारसांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमादेखील झाली असून एका प्रवाशाच्या वारसाने मदत नाकारली आहे, तर एका प्रकरणात वारसा हक्काबाबतची स्पष्टता होत नसल्याने मदत अद्याप देण्यात आलेली नाही.दरम्यान, रिक्षामधील नऊ प्रवाशांना विशेष बाब म्हणून दोन लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली असल्याने संबंधित वारसांनी राज्य परिवहन महमंडळाच्या कार्यालयात तत्काळ कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना चोवीस तासात मदत सुपूर्द केली जाईल, असे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले. दरम्यान, बस चालकाला देण्यात येणाºया मदतीबाबत महामंडळाच्या नियमानुसार सर्व भरपाई दिली जाणार असून, मदतीची रक्कम कोर्टात जमा करण्यात आली असल्याचे मैंद यांनी सांगितले.एकाने दिला नकारबस अपघातातील मयत व्यक्तीच्या वारसाने मात्र मदत घेण्यास नकार दिला आहे. राज्य शासनानकडून देण्यात येणाºया मदतीसाठी त्यांनी कोणताही दावा केलेला नसल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. संबंधित वारसाने मदत नको असल्याचे महामंडळाला कळविल्याचेही सांगण्यात आले.केंद्राकडूनही मदतया अपघातातील मयतांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ५६ लाखांचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राकडे पाठविला आहे. या अपघाताची दखल केंद्राकडूनही घेण्यात आली असून, जिल्हा प्रशासन आणि महामंडळाला विचारणा करण्यात आली होती. केंद्राच्या सूचनेवरून मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येकी दोन लाख रुपये वारसांना केंद्राकडूनदेखील मिळणार आहेत.
बस अपघातातील वारसांना मदत सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:33 AM
मालेगाव-कळवण रस्त्यावर देवळा तालुक्यात गेल्या २८ जानेवारी रोजी झालेल्या बस आणि रिक्षा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बसमधील प्रवाशांच्या वारसांच्या खात्यावर प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. रिक्षातील मयत नऊ प्रवाशांनादेखील विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. मयतांच्या वारसांना तत्काळ मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.
ठळक मुद्देप्रत्येकी दहा लाख : खात्यावर पैसे जमा