निफाड : तालुक्यातील दिंडोरी तासचे उपसरपंच संदीप तासकर यांनी आपल्या मातोश्री कै. कलावती लक्ष्मणराव तासकर यांच्या वर्षश्राद्धासाठी होणारा खर्च टाळून दिंडोरी तास जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर संस्थांना असे एकूण एक लाख एकवीस हजार रूपयांची मदत करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.दिंडोरी तास येथील जि. प.प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्र मात तासकर यांनी एक लाख एकवीस हजार रु पयाचा धनादेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी व्यासपीठावर निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी सुराशे, सेनेचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप, निफाडचे गटशिक्षणाधिकारी के. व्ही. तुंगार व केंद्रप्रमुख व्ही. के. सानप , आदी मान्यवर होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती तासकर होत्या. याप्रसंगी तासकर यांचा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मदत करणारे दिंडोरी तासचे ग्रामस्थ प्रभाकर कारभारी तासकर, बाजीराव रंगनाथ तासकर,अण्णासाहेब गंगाधर जाधव, नानासाहेब फिकरा शिरसाठ ,बाळकृष्ण बाहीकर , मधुकर देवराम तासकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वर्षश्राद्धासाठीचा खर्च टाळून शाळेस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:33 PM