मालेगाव : बलात्कार प्रकरणातून संशयित आरोपीला हजेरी लावण्यास सवलत द्यावी यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाºया तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दत्तू बोराटे यांना नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले होते. संशयित आरोपीला हजेरीत सवलत देण्यासाठी त्याच्या आईकडे बोराटे यांनी गेल्या २ जानेवारी रोजी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानुसार तक्रारदार महिलेने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलीसठाण्यात बोराटे यांनी त्यांच्या दालनात दहा हजार रूपयांची लाच स्वीकारली.यावेळी लाचलुचपत पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक मुदृला नाईक, पोलीस हवालदार दीपक कुशारे, किरण अहिरराव आदिंनी ही कारवाई केली. याप्रकरणी vकरण्यात आला आहे.
दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:19 AM
मालेगाव : बलात्कार प्रकरणातून संशयित आरोपीला हजेरी लावण्यास सवलत द्यावी यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाºया तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक ...
ठळक मुद्देतालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल