नाशिक : मंत्रिमंडळाच्या आर्थिक नियोजनाच्या बैठकीत आदिवासी विकास विभागांतर्गत कंत्राटी व तासिकेवर असलेल्या राज्यभरातील सुमारे ३२०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी राज्य आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष रितेश ठाकूर यांनी दिली. येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम न केल्यास संघटनेचे २५ फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण व त्यानंतर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी विकासमंत्र्यांना दिल्याचे रितेश ठाकूर यांनी सांगितले. मागील डिसेंबर महिन्यात २३ ते ३१ दरम्यान आदिवासी विकास आयुक्तालयात महाराष्ट्र राज्य कंत्राटी व रोजगार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोेलन केले होते. त्यावेळी आदिवासी विकासमंत्र्यांनी हा प्रश्न आठवडाभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तांना २ फेब्रुवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला होता. काल या संघटनेच्या पाच पदाधिकाऱ्यांची दुपारी दोन ते तीन दरम्यान आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा केली
तीन हजार कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांशी आंदोलकांची चर्चा
By admin | Published: February 11, 2015 1:03 AM