लासलगाव : आंतरराष्ट्रीय जल साक्षरता दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्यामंदिर शाळेमध्ये जलसाक्षरता अभियान, जलसंवर्धन व वृक्षिदंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्र मप्रसंगी मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी कमी पावसामुळे पाण्याची टंचाई, पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याचे विविध उपयोग, पाण्याचे स्त्रोत, पर्यावरण व वसुंधरा संवर्धन, वॉटर हार्वेस्टिंग याविषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जलसंवर्धन व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. पाणी वाचवा जीवन वाचवा, बचत पाण्याची गरज काळाची, पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन, पाणी नाही द्रव्य पाणी आहे अमृततुल्य, झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी, कागद वाचवा, झाडेच झाडे लावूया, फुले-फळे वेचूया, वसुंधरा आमची छान, चला राखू तिचा मान अशा विविध घोषणा देऊन गाव परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली.कार्यक्र मात सुनील आव्हाड, कैलास पातळे, संदीप सूर्यवंशी, नवनाथ जिरे, मोहन नाइक, प्रदीप ठाकरे, कांचन शेलार, स्वप्नील आहिरे, रूपाली दिवटे, पुनम बोरसे आदींनी सहभाग घेतला.
सरस्वती विद्यामंदिरात जलसाक्षरता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 7:53 PM
लासलगाव : आंतरराष्ट्रीय जल साक्षरता दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्यामंदिर शाळेमध्ये जलसाक्षरता अभियान, जलसंवर्धन व वृक्षिदंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देलासलगाव : जलसंवर्धन, वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन