नाशिक : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत तपासणी सुरू असताना, निकषात न बसणारे अर्ज बाद होणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. नाशिक जिल्ह्यात यासाठी सुमारे १५ लाख ७० हजार महिला लाभ घेत असून, त्यातून दुहेरी लाभ घेणाऱ्या सुमारे लाखभर महिला आणि निकषात न बसणाऱ्या ८० हजार, अशा एकूण १ लाख ८० हजार महिला योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४१ महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभसोडण्यासाठी अर्ज दाखल केले असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, आर्थिक स्वावलंबन प्राप्त व्हावे यासाठी महायुती सरकारने जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेनुसार आर्थिक स्वावलंबनासाठी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत आहेत. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज दाखल केले. सरकारी नोकरी, चारचाकी वापरणाऱ्या, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला तथा शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना नाव वगळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
१५.७४ लाखांपैकी ८० हजार अर्ज बाद होण्याची शक्यतानाशिक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत १५ लाख ७४ हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहे. त्यातील सुमारे ८० हजार अर्ज बाद होण्याची शक्यता महिला व बालविकास विभागाने वर्तविली आहे. याशिवाय इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण नाशिकमध्ये जास्त आहे. 3 त्यात महिलांचे प्रमाणही जास्त असल्याने अशा १ लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.