अझहर शेख
नाशिक - जिल्ह्यासह शहरात पावसाने कमालीची ओढ दिली आहे. धरणांनी तळ गाठला असून गोदामाईही पावसासाठी आसुसली असून अद्यापही मेघगर्गर्जनेसह मुसळधार पावसाची प्रतीक्षा शहरवासीयांसह अवघ्या जिल्ह्याला कायम आहे. मागील वर्षी गंगापूर धरणातून ११ जुलै रोजी १०हजार क्युसेकपर्यंत विसर्ग गोदावरीत वाढविला गेला होता. यावर्षी गंगापूर धरणात मात्र सध्या केवळ ३९टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.
५ जूनपासून पावसाचा हंगाम सुरू होतो. जून कोरडाठाक गेल्यानंतर जुलै महिन्याचाही पंधरवडा उलटला आहे; मात्र अद्यापही दमदार पाऊस नाशिकमध्ये झालेला नाही. यामुळे आता चिंतेचे ढग जिल्ह्यावर दाटून आले आहे. यामुळे नाशिककरांसह महापालिका, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. गोदावरी खोऱ्यामधील सर्वच धरणांचा जलसाठा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आला आहे. यामुळे आता वरूणराजाची दमदार हजेरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये होणे अपेक्षित आहे, अन्यथा ‘जलसंकट’ निर्माण होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. नाशिक शहरात १ जूनपासून आतापर्यंत केवळ १३३.१ मिमी इतका पाऊस मोजण्यात आला आहे.
जुलैच्या पंधरवड्यात गोदेला होता पूर
मागीलवर्षी गोदावरी नदीला ११ ते १६ जुलैदरम्यान पुरसदृश्य स्थिती निर्माण झालेली होती. १२जुलै २०२२ रोजी गोदावरीच्या होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात २१ हजार २५५ क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित होता. यावरून यंदाच्या पावसाच्या स्थितीचा अंदाज सहज लावता येऊ शकतो. यावर्षी पावसाच्या ओढमुळे अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
केवळ 133 मिमी पाऊसशहरात या हंगामात आतापर्यंत केवळ १३३ मिमी इतका पाऊस पडला आहे. गेल्या हंगामात सर्वाधिक उच्चांकी पावसाची नोंददेखील जुलैच्या ११ व १२ तारखेला झाली होती, तेव्हा २४ तासांत शहरात ५५८ मिमी इतका पाऊस पेठरोडवरील हवामान केंद्राकडून मोजण्यात आला होता.
शहरातील पर्जन्यमान असे...(वर्ष-२०२२)जुलै- ५५८ मिमी
ऑगस्ट- २५० मिमीसप्टेंबर- ३१७ मिमी
---आकडेवारी---
नाशिकच्या मुख्य धरणांचा जलसाठा असा...(टक्क्यांत)धरण- वर्ष २०२२- वर्ष २०२३
गंगापुर- ६३- ३९काश्यपी- ६१ - २०
गौतमी- ७२- १५मुकणे- ६६- ५०
आळंदी- १००- ०४दारणा - ६६- ५३
पालखेड- ४९- ३४करंजवण- ८१- २०
वाघाड- १००- -१३ओझरखेड- ७८- ११