गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत (जि नाशिक)- आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे दोन दिवसापूर्वी कांद्याला समानधनकार दर न मिळत असल्याने कांदा लिलाव बंद होते मात्र नाफेड मार्फत खरेदी सुरू झाल्याने पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले.आज गुरुवारी कांदा लिलाव सुरू होत असतानाच व्यापाऱ्यांनी नाफेड पेक्षाही कमी भाव पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. यामुळे पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मोठा गोंधळ निर्माण झाला.
शासनाने जे २४१० भाव पुकारला आहे मग पिंपळगाव बाजार समितीत खूप कमी भाव पुकारला जात असताना शेतकरी संतप्त झाले आहे .आतापर्यंत कोणतेही राजकीय पदाधिकारी आमच्याकडे आले नाही. तर शासनाने नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणार असल्याने शासनाचा किंवा नाफेडचा तसेच नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कोणत्याही कंपनीचा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कांदा खरेदीसाठी आला नाही. जर तो कर्मचारी किंवा नाफेड मार्फत येथे लिलाव सुरू झाले त्यावेळेस असते तर व्यापारी व नाफेडचे प्रतिनिधी यांच्यात भाव पुकारण्यावरून चढाओढ झाली असती व दोन पैसे निश्चितच शेतकऱ्यांना मिळाले असते. मात्र या ठिकाणी नाफेडचा एकही प्रतिनिधी नसल्याने शेतकरी व्यापाऱ्यांनी २४०० पेक्षाही कमी दर पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले आणि लिलाव बंद पाडले.