नाशिक : देव, धर्म या माणसाच्या डोक्यातील कल्पना असून, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराच्या अस्तित्वाचा एकही पुरावा मिळून येत नाही किंवा आस्तिकांच्या ईश्वरी कल्पनेविषयीच्या युक्तिवादांपैकी एकही युक्तिवाद न पटणारा आहे. मानवजातीला आज भेडसावणाऱ्या समस्या श्रद्धेने सुटणार नाही तर त्या अधिक भयावह स्वरूप धारण करतील, असे प्रतिपादन तत्त्वज्ञान विषयक लेखन करणारे लेखक शरद बेडेकर यांनी केले.शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्यावर विवेकधारा संस्थेच्या वतीने रविवारी (दि.२५) गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात ‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण आठ प्रमुख धर्म जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केले आहेत. मानवजातीला भेडसावणारे वर्तमानातील विविध प्रश्न हे श्रद्धेने सुटू शकत नाही तर विज्ञानाचा आधार घेत चिकित्सकवृत्तीने विचार केल्यास सुटतील, असे बेडेकर म्हणाले. जाती-धर्माच्या नावाने जगाच्या पाठीवर अन्याय, अत्याचार, मानवी युद्ध घडवून आणले जात असताना प्रेमळ, दयाळू देव हे सगळे का थांबवत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पृथ्वीवरील सर्व जाती-धर्माचा ईश्वर, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या कल्पना वेगवेगळ्या कशा असू शकतात, अशी शंकाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पुराणकथा सत्य मानत जगणारा वर्ग मोठा आहे व आपल्या सभोवताली घडणारे धार्मिक उत्सव व त्यांची व्यापकता त्यामुळे मोठ्या स्वरूपात जाणवते. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला जात-धर्म काहीही नसते; मात्र त्याचे संगोपनकर्ते व जन्मदात्यांमुळे त्याच्यावर जात-धर्म बिंबविला जातो. सत्यवादी दृष्टिकोनातून विज्ञानाचा आधार घेत मानवाने धर्मनिरपेक्ष नव्हे तर निरीश्वरवादी जीवनाचा स्वीकार केल्यास समाजातून सर्व दु:ख आणि समस्या नष्ट होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान, लोके श शेवडे यांनी मुलाखतीदरम्यान, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, माणसाला नास्तिकता रूक्ष बनविते असे नाही तर आनंदी जीवन जगण्यासाठी व जीवनातील गोडवा टिकविण्यासाठी श्रध्देची नव्हे तर कलेवरील प्रेमाची गरज असते, असेही ते म्हणाले.
नास्तिक मेळावा : मानवजातीच्या समस्या श्रद्धेने सुटणे अशक्यच - शरद बेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 5:26 PM
‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण आठ प्रमुख धर्म जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केले आहेत.
ठळक मुद्देविज्ञानाचा आधार घेत चिकित्सकवृत्तीने विचार केल्यास सुटतीलपृथ्वीवरील सर्व जाती-धर्माचा ईश्वर, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या कल्पना वेगवेगळ्या कशा असू शकतात माणसाला नास्तिकता रूक्ष बनविते असे नाही