रिकाम्या हाताने परतावे लागले घरी
नाशिक : राज्य शासनाने सर्व दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिल्याने पहिल्या दिवशी अनेक नागरिकांचा गोंधळ उडाला ११ नंतर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने पुन्हा घरी परतावे लागले
आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
नाशिक : शहरातील महापालिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्य वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर काम भागविले जात आहे.
बाहेरील रुग्णही नाशिकमध्ये दाखल
नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढल्याने जिल्ह्याबाहेरील रुग्णही नाशिक येथील रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याने जागा मिळणे मुश्कील झाले आहे. बहुसंख्य रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
अनेकांना घरातही लावावा लागतो मास्क
नाशिक : शहरात कोरोनाचा प्रकोप इतका वाढला आहे की घराघरात रुग्ण आढळून येऊ लागले आहे. अनेकांना घरातही मास्क लावूनच वावरावे लागत आहे. अनेक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत असल्याने घरातील इतर सदस्यांना काळजी घ्यावी लागत आहे.
चांगल्या प्रतीचा मास्क वापरण्याचे आवाहन
नाशिक : कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शहरात मास्क विक्रीत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी साधे कपड्याचे मास्क न वापरता चांगल्या प्रतीचा मास्क वापरावेत असे आवाहन आरोग्य यंत्रणेच्यावतीने करण्यात आले आहे. शक्यतो एन ९५ मास्कला प्राधान्य द्यावे सांगितले जात आहे.
शहरातील गर्दीवर झाला परिणाम
नाशिक : सकाळी ११ वाजता दुकाने बंद झाल्याने शहरातील गर्दीवर त्याचा परिणाम दिसून आला असून अनेक परिसरात दिवसभर शुकशुकाट दिसून आला. मुख्य रस्त्यांवरही वाहनांची तुरळक गर्दी दिसत होती.