पाळे खुर्द : वसाका प्रशासनाने कारखाना चालू करण्यास चालू करण्यासाठी बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्र म घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर केला असून लवकरच कारखाना गळीतासाठी सज्ज होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. लवकरच कारखान्यांनी ऊस तोडणी हंगाम सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांंकडून भावना व्यक्त होत आहे. गेल्या वर्षापासून कारखाना बंद असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचे सूर होते. कारण वसाका हा कसमादे पट्ट्यातील एक मोठा महत्वाचा घटक शेतकºयांकरता असल्याने तो सुरू झाल्याने आनंदाची गोष्ट व्यक्त होत आहे. आज पर्यंत वसाका सुरळीत न चालल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. कुठल्याही परिस्थिती हंगाम पूर्ण करून शेतकºयांना दिलासा देण्याची काम वसाका प्रशासनाने करावी त्याचप्रमाणे शेतकºयांसाठी काही सुविधा उपलब्ध करून द्याव्या शेतकरीवर्ग नेहमीच वसाका पाठीशी राहण्यासाठी अिग्रम असल्याचे शेतकरी वर्गाकडून शेवटी सांगण्यात आले.वसाका सुरळीत सुरू होता हंगाम पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल होत होती परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी कामगारांचे राजकारण करून कारखाना बंद पाडला व प्रवेश बंद करून गाळप झालेली साखर सुध्दा विक्र ी होऊ दिली नाही व तो संपूर्ण साखर कारखाना जिल्हा अधिकारी यांचेकडे सुपूर्द केला गेल्याने शेतकर्यांची बिल आदा करता आले नाही.- विलास मुरलीधर पाटील, शेतकरी, पाळे खुर्द.कासमादे हे प्रचंड उसाचे आगार होते परंतु वसाका बंद झाल्याने शेतकर्यांचा हिरमोड होऊन ऊस पीक मोडून इतरत्र पिकांची दिशा घ्यावी लागली त्यामुळे हक्काचे ठिकाण असलेले ऊस पिक गेल्याने शेतकर्यांना मोठी आर्थिक हनी सोसावी लागली कारण वसाका बंद पडल्याने इतरत्र ऊस देणे जिकरीचे झाले होते. आता कार्य क्षेत्रातच कारखाना असल्याने शेतकºयांना ऊस लागवड करून कारखान्यास ऊस देणे सोपस्कर होईल तसेच कळवण तालुक्यातील शेतकºयांचे मागील वर्षीचे २००० रु पये प्रमाणे पेमेंट मिळाले असून उर्वरित ३२५ रु पये पेमेंट करखान्याकडे थकीत आहे ते लवकरात लवकर अदा करून शेतकर्यांना दसरा, दिवाळी साजरी करता येणार आहे.किरण वसंत पाटील, शेतकरी, पाळे खुर्द.
वसाका सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 4:25 PM
पाळे खुर्द : वसाका प्रशासनाने कारखाना चालू करण्यास चालू करण्यासाठी बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्र म घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर केला असून लवकरच कारखाना गळीतासाठी सज्ज होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
ठळक मुद्देवसाका बंद पडल्याने इतरत्र ऊस देणे जिकरीचे झाले होते.