शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

पोलिसांच्या ‘घरात’ जाऊन फोडले एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:58 AM

ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम कक्षात जाऊन अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एटीएम यंत्राची तोडफोड केली. यंत्रामध्ये असलेला रोकडचा ‘ट्रे’ काढता न आल्यामुळे रक्कम चोरी होऊ शकली नाही,

पंचवटी : ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम कक्षात जाऊन अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एटीएम यंत्राची तोडफोड केली. यंत्रामध्ये असलेला रोकडचा ‘ट्रे’ काढता न आल्यामुळे रक्कम चोरी होऊ शकली नाही, मात्र पोलिसांच्या वसाहतीत जाऊन चक्क एटीएम फोडण्याचे धाडस करणाºया या चोरट्याने पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.आडगाव शिवारातील ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलिसांच्या वसाहतीमध्ये प्रवेश करून बॅँकेच्या एटीएमवर डल्ला मारण्याचा चोरट्याचा डाव अगदी थोड्यावरून हुकला अन्यथा एटीएममधील रोकड लुटून नेण्यास चोरटा यशस्वी ठरला असता. हा चोरटा तिसºया डोळ्यात कैद झाला असला तरी त्याच्या चेहºयावर मास्क असल्यामुळे पोलीस त्याचा कितपत माग काढण्यास यशस्वी ठरतात, हे लवकरच दिसून येईल. कारण आडगाव पोलिसांना गोळीबारातील फरार संशयितांचा अद्याप मागमूस लागू शकलेला नाही. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या चाचणी परीक्षेतही हे पोलीस ठाणे अखेरच्या क्रमांकावर घसरले असून, कायदा सुव्यवस्थेत त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे आडगाव पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांकडे या घटनेबाबत बँकेचे कर्मचारी मुकुंद रमेश नंदरवाल यांनी  तक्र ार दिली आहे.दोन सीसीटीव्ही फोडलेएटीएम केंद्राच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्याने फोडून प्रवेश केला. एटीएम यंत्र संपूर्णत: उद्ध्वस्त केले, मात्र चोरट्याला रोकड असलेली पेटी वजा ट्रे काढता येऊ न शकल्यामुळे रोकड सुरक्षित राहिली अन्यथा चोरट्याचा डाव यशस्वी ठरला असता. चोरट्याने सीसीटीव्हीचे नुकसान जरी केले तरी दुसºया कॅमेºयात त्याचा प्रताप कैद झाला आहे. त्याने चेहरा झाकल्यामुळे या फुटेजचा कितपत फायदा होईल.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी