१० जानेवारी रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित आरोपी महिला पुजा वाघ हिने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला तीच्या राहत्या घरातुन बळजबरीने बाहेर काढत स्वतःच्या राहते घरी घेवुन जावुन, घरात ढकलुन दरवाजा बाहेरून बंद केला होता. यावेळी खोलीत असलेल्या सर्वांनी मिळून पिडीत अल्पवयीन मुलीला चाकु पोटात खुपसण्याचा धाक दाखवुन आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या गंभीर व क्रूर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक नितीन कंडारे, मनिषा राउत यांनी कसोशीने करत सबळ पुरावे गोळा केले. गुन्हयाच्या तपासात संशयितांच्या टोळीचा प्रमुख सुनिल निंबाजी कोळे २४, रा. अम्रपाली झोपडपट्टी)याने संघटीत गुन्हेगारी करण्यासाठी साथीदारांनासोबत घेवुन टोळी तयार केलेली असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने हा गंभीर गुन्हा नियोजनबध्द रितीने स्वतःचा व टोळीतील सदस्यांचा आर्थिक फायदा करण्यासाठी बेकायदेशीरपणे हिंसाचाराचा वापर करून, संयुक्तपणे केल्याचे पुढे आले. टोळीने त्याचे साथिदार आकाश राजेंद्र गायकवाड, (२२, रा. एकलहरा रोड), रवि उर्फ फॅन्ड्री संतोष कुऱ्हाडे (१९, रा. मुक्तीधामचे पाठीमागे), दिपक समाधान खरात (१९, रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड), सोमनाथ उर्फ सोम्या विजय खरात १९, रा. गुलाबवाडी, मालधक्का रोड), पुजा सुनिल वाघ (२७, रा. अरिंगळे मळा) आणि १५ वर्षाचा अल्पवयीन गुन्हेगार यांच्यावर बलात्कार, पोस्को चा गुन्हा दाखल करून अटक केली.
संघटीत गुन्हेगारी टोळीतील त्यांचे साथीदार असलेले आकाश राजू आठवले (19, उपनगर), अमोल बाळासाहेब शेजुळ (१९, रा. उपनगर), रहेमान सुलेमान शेख( ३३, रा. जेलरोड), सायमन पॅट्रीक मॅनवेल, रा. इगतपुरी), समीर मुस्ताक खान रा. भिवंडी, ठाणे), ताजमुल सलीम शेख, रा. बजरंग वाडी, इगतपुरी), भुषण सुधाकर दोडमल, रा. लासलगाव, निफाड), किशारे गणेश गिरी, रा. इगतपुरी) हेदेखील या गुन्हयात निष्पन्न झालेले आहेत. यांनी मिळून गुन्हयाचा कट रचला तसेच गुन्हण्याचे ठिकाण निश्चीत करत टोळीतील साथीदारांना पैसे पुरविल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
-----इन्फो-----
गुन्हेगारांवर बसेल वाचक
या सराईत गुन्हेगारांनी आपल्या दोन टोळ्या तयार केल्या होत्या. नाशिक, अहमदनगर, ठाणे या तीन जिल्ह्यात या टोळ्यांनी धुडगूस घातला होता. टोळीतील गुन्हेगारांवरसुद्धा नाशिकरोड, उपनगर, संगमनेर, जीआरपी कल्याण पोलीस ठाण्यात विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही टोळ्यांनी नाशिक शहरात तसेच ग्रामीण भागात आणि संगमनेर तालुका ठाणे, कल्याण या भागात संघटित गुन्हेगारी सातत्याने सुरु ठेवल्याचे तपासात पुढे आल्याने त्यांच्याविरुद्ध
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का)च्या विविध वाढीव कलमे लावून ठोस कारवाई केल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख हे करीत आहेत..