नाशिकरोड : कोपर्डीच्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच २४ आॅक्टोबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला आपला पाठिंबा असून, मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार योगेश घोलप यांनी पत्रकार परिषदेत केले.कोपर्डीची घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. यापुढे अशी घटना घडू नये किंवा कोणी धाडस करू नये याकरिता गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आमदार योगेश घोलप यांनी केली. अॅट्रॉसिटीचे दाखल होणारे ९० टक्के गुन्हे हे खोटे असतात. अॅट्रॉसिटीच्या कायद्यात दुरुस्ती व बदल करणे गरजेचे आहे. तसेच अॅटॉासिटीचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी दोन्ही बाजू तपासून घेतल्या पाहिजेत, अशी मागणी घोलप यांनी केली. देवळाली मतदारसंघ गेल्या ३० वर्षांपासून राखीव असून, आमच्या घोलप कुटुंबीयावर दाखविलेल्या प्रेमाची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे निंदनीय घटनेच्या निषेधार्थ निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला माझा वैयक्तिक पाठिंबा आहे. या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन घोलप यांनी केले. (प्रतिनिधी)
अॅट्रॉसिटी कायद्यात व्हावा बदल : घोलप
By admin | Published: September 20, 2016 2:03 AM