शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

अंबडला प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:57 PM

कृष्णानगर बसथांब्याजवळ दाबेली, पाणीपुरी यांसारखे चाट खाद्यपदार्थ हातगाडीवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यास दोघा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी दमदाटी करत धमकावून रविवारी (दि.२६) संध्याकाळी चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देविक्रेत्याला जबर मारहाण : संतप्त रहिवाशांचा रस्त्यावर ठिय्या

सिडको : येथील कृष्णानगर बसथांब्याजवळ दाबेली, पाणीपुरी यांसारखे चाट खाद्यपदार्थ हातगाडीवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यास दोघा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी दमदाटी करत धमकावून रविवारी (दि.२६) संध्याकाळी चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली. तसेच तेथून जात असलेले बाजीराव दातीर (४६, रा. दातीर मळा) यांच्यावरही हल्ला चढविल्याने परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, दातीर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित करण अण्णा कडुस्कर, मनोज भोजने या दोघा संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.महालक्ष्मीनगर, कृष्णानगर या भागात गुन्हेगारी फोफावत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही येथे काही समाजकंटकांनी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने वाहनांची जाळपोळ केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र जोपर्यंत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी येणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा रहिवाशांनी घेतल्यामुळे अखेर काही वेळेत नांगरे पाटील घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांची समजूत काढत या भागातील वाढलेली गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक ांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात प्रभाग सभापती दीपक दातीर, नगरसेवक राकेश दोंदे, साहेबराव दातीर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.अंबड पोलिसांकडून या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या जात नसल्याने कायदासुव्यवस्था धोक्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नानंतर परिसरातील केवल पार्क, महालक्ष्मीनगर, कृष्णानगर आदी भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या देत संशयित गुंडांना अटक करावी, या मागणीसाठी आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStrikeसंप