शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:47 PM

ऊस सोडला तर एकाही पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकºयांचे जीवन असुरक्षित झाले आहे. शेतकºयांना सुरक्षित करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमीभाव घेणारच, असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला. निफाड तालुक्यातील पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा घेण्यात आली. यावेळी खासदार राजु शेट्टी यांनी सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी वर्गावर हल्लाबोल करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

पिंपळगाव बसवंत : ऊस सोडला तर एकाही पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकºयांचे जीवन असुरक्षित झाले आहे. शेतकºयांना सुरक्षित करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमीभाव घेणारच, असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला. निफाड तालुक्यातील पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा घेण्यात आली. यावेळी खासदार राजु शेट्टी यांनी सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी वर्गावर हल्लाबोल करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.  पालखेड येथे महाराष्ट्रातील सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारांच्या उपस्थितीत हल्लाबोल सभा घेण्यात आली. राजू शेट्टी यांचे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी भर उन्हात बसून होते. सभेच्या सुरुवातीला रविकांत सुपकर, हंसराज वडघुले, रणजित बागल, दिलीप बनकर, बाबा शिंदे आदींची भाषणे झाली.या सभेत खासदार राजू शेट्टी यांनी या शासनाच्या धोरणामुळेच शेतकरी वर्ग त्रासून गेला आहे. राज्यात केवळ ऊस वगळता अन्य कुठल्याही पिकाला हमीभाव नाही. ज्या व्यक्तीने तेरा वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविले अशी व्यक्ती आता शेतकºयांना फसवीत आहे. शेतीसाठी लागणाºया सर्व साहित्यावर जीएसटी लागतो मग आमच्या उत्पादनाला हमीभाव का देत नाही? केवळ २० टक्के शेतकरी पिकवणारे व ८० टक्के खाणारे असा विचार करून पिकवणाºयाचा विचार का करत नाही? पिकवणारे जोपर्यंत एक होत नाहीत तोपर्यन्त हे शासन वठणीवर येणार नाही. आपली एकजूट होत नसल्याचा फायदा हे सरकार घेत आहे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी उपस्थित होते. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार हमीभाव घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढील काळात ही चळवळ संपूर्ण देशात उभी करावी लागणार आहे. भाजपाने अज्ञानातून फसवी आश्वासने दिली. आता शासनाला वठणीवर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे या शासनाच्या मंत्र्यांना गावात फिरकू देणार नाही. शासनाच्या मानगुटावर बसून सातबारा कोरा करणार. फसवून मते मिळविली असून, यापुढे आता हे चालणार नाही. सर्वात प्रगतिशील जिल्ह्यात आत्महत्या होत आहेत ही शोकांतिका असून, यापुढे पायातील हातात घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी