सिन्नर : मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदनसिन्नर : राजधानी दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया शेतकºयांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. कृषिप्रधान भारत देशात अशा प्रकारे शेतकºयांची आंदोलने दडपण्याचे आणि ठोकशाही पद्धतीने शेतकºयांवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू असल्याचा आरोप निवेदनात मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. दिल्लीत शेतकºयांच्या मोर्चावर लाठीमार, अश्रूधुराचा वापर करून अनेक शेतकºयांना जखमी केले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सांगळे यांच्यासह शहराध्यक्ष निखिल लहामगे, संतोष लोंढे, एकनाथ दिघे, संतोष गांजवे, भिवाजी शिंदे, धनंजय बोडके, सागर बेनके, स्वप्निल आव्हाड, गणेश सांगळे, श्रीकांत पवार आदींसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाकडून लोकशाही मार्गाने केली जाणारी आंदोलने दडपली जाणार असतील तर शेतकºयांनी न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न करत मनसेच्या वतीने या कृत्याचा निषेध नोंदविला. मनसेच्या पदाधिकाºयांनी याबाबत निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार जाधव यांना दिले.
शेतकºयांवरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:57 PM
सिन्नर : मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदनसिन्नर : राजधानी दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया शेतकºयांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
ठळक मुद्दे नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.