येवला : तालुक्यातील नगरसूल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या नागडे येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा सोमवारी (दि.२०) मृत्यू झाला. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दगडफेक केल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.नागडे येथील बाधित ७२ वर्षीय वृद्धाच्या संपर्कातील संशयितांचे स्वॅब आरोग्य यंत्रणेने घेतले होते. त्यात कुटुंबातील तीन अहवाल पॉझिटिव्ह आले. आरोग्य विभागाने ६५ वर्षीय वृद्ध महिलेसह ५२ व २३ वर्षीय पुरुष अशा तिघांना नगरसूल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करून उपचार सुरू केले होते. उपचारादरम्यान, सोमवारी (दि. २०) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने वैद्यकीय अधिकाºयांनी आॅक्सिजनसह तातडीचे उपचार सुरू केले.मात्र दुर्दैवाने वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यातून वैद्यकीय अधिकारी डॉ. मदनुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. आनंद तारू पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे बचावले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रोहिदास वारुळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाइकांची समजूत काढली. मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास नगरसूल येथेच वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.--------------------नगरसूल ग्रामीण रुग्णालयात गोंधळनगरसूल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मदनुरे यांनी मृताच्या नातेवाइकांना याबाबत माहिती दिली. सुमारे नऊ वाजेच्या सुमारास नातेवाईक रुग्णालय आवारात जमा होऊन आले. त्यांनी वैद्यकीय अधिकाºयांशी वाद घातला. संबंधितांवर कारवाई करा, नुकसानभरपाई द्या, त्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असे सांगत शिवीगाळ करून दगडफेक केली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 9:07 PM