वीजप्रश्नी पाटोदा येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तालुका पदाधिकाऱ्यांची भेट घेत, यावर तोडगा काढण्याची विनंती केली. जोवर पूर्ण वेळ अखंडित वीजपुरवठा सुरू होत नाही, तोवर वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, तालुका संघटक किरण चरमळ, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे यांनी आंदोलन स्थळी जात वीज वितरणचे स्थानिक व वरिष्ठ अधिकारी, जलसंपदा येवला विभागाचे अभियंता व कार्यकारी अभियंता यांना वस्तुस्थिती पटवून देत, वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.
याप्रसंगी रामभाऊ नाईकवाडे, शंकर गायके, गोरख निर्मळ, बापुसाहेब शेलार, सुनील पाचपुते, दत्तू बोरणारे, बाळासाहेब बोराडे, श्याम मेगाने, ज्ञानेश्वर बोरणारे, ज्ञानेश्वर महाले, शंकर नाईकवाडे, नितीन मेंगाने, संजय बोराडे, किशोर भोसले, सोपान जाधव, धनंजय पाचपुते, किरण पाचपुते, मनोज कुंभकर्ण, गणेश कुंभकर्ण, अमोल मेंगाने, सचिन बोराडे, कृष्णा घोरपडे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
इन्फो
मुख्य वाहिनीच खंडित
तालुका परिसरातून पालखेड डावा कालवा जात असलेल्या कालव्यास सध्या रब्बी आवर्तन चालू असून, जलसंपदा विभागाने वीज वितरण कंपनीस कालवा परिसरातील शेती पंपाचा पाणी उपसा होऊ नये, म्हणून वीजपुरवठा खंडित करण्याचे तोंडी आदेश दिले, परंतु वीज वितरण कंपनी नेहमीप्रमाणे कालवा परिसरातील वीज खंडित न करता, सरसकट पूर्ण मुख्य वाहिनीच खंडित करून कालवा परिसरापासून दोन्ही बाजूंच्या सुमारे पाच किलोमीटर परिसरात वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती.
फोटो- ०८ प्रहार येवला
महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन देताना प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी.
===Photopath===
080221\08nsk_44_08022021_13.jpg
===Caption===
फोटो- ०८ प्रहार येवला महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन देताना प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी.