सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका, एकत्र येऊ नका असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच दोन तरुणांनी हल्ला केल्याची घटना सायखेडा येथे सोमवारी (दि. २३) घडली. याप्रकरणी हवालदार तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल बाबूराव कुटे व संतोष बाबूराव कुटे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.सायखेडा पोलिसांमार्फत नागरिकांनी एकत्र जमून गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात येत होते. यासंदर्भात सायखेडा येथील त्रिमूर्ती चौक येथे सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, हवालदार सोनवणे, मदन कहांडळ यांना तरु णांचा जमाव येताना दिसला असता त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहनकेले. मात्र त्यातील अमोल कुटे व संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालतशिवीगाळ केली. तसेच पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून अमोल कुटेयाने पाठीमागून पकडून धरले तर संतोष कुटे याने काठीने सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, हवालदार सोनवणे, कहांडळ यांच्यावर हल्ला केला व गणवेश फाडला.
सायखेड्यात पोलिसांवर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:20 AM