शिवसैनिकांनी एका मोटारीतून येत भाजपचे गंजमाळ येथील ‘वसंत स्मृती’ या मुख्य कार्यालयावर दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यालयाबाहेर पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त तैनात करण्यात आलेला नव्हता, असे फरांदे यांनी सांगितले. भाजपच्या कार्यालयाला संरक्षण का पुरविले गेले नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे नाशिक शहर पोलिसांची भूमिका आणि राणे यांच्याविरोधातील कारवाई पारदर्शी असल्याचे दिसत नाही, असेही त्या म्हणाल्या. २४ तासांत जर भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली नाही, तर भाजप शहरात पोलिसांच्या कारभाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरेल, असा इशाराही पाण्डेय यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, नगरसेवक दिनकर पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीष पालवे, विजय साने, नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, जगन पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-------
---इन्फो---
राजकीय गुंडांवर कठोर कारवाई होणार
ज्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली, त्यांची ओळख पटली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी यावेळी भाजप नेत्यांना दिले. शहरात दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यालयावर ज्या टोळ्यांनी धुडगूस घातला ते राजकीय गुंड असून त्यांना राजकीय गुंडांप्रमाणेच पोलिसांकडून वागणूक दिली जाणार आहे, त्यामुळे राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव पोलिसांवर आताही नाही, आणि यापुढेही दिसणार नाही, असेही पाण्डेय म्हणाले.
--इन्फो---
राणे यांना बॅकफुटवर आणण्यासाठी कटकारस्थान
राणे यांना बॅकफुटवर आणण्यासाठी शिवसेना कटकारस्थान करत आहे. पोलिसांना पुढे करून सत्ताधारी शिवसेना भाजपच्या कार्यालयांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही फरांदे यांनी भाजपच्या वतीने केला. महाराष्ट्रात धोक्यात आलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत राज्याच्या प्रमुख नेत्यांनी वेळीच लक्ष घालावे, अन्यथा राज्याची जनता माफ करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
240821\24nsk_34_24082021_13.jpg~240821\24nsk_35_24082021_13.jpg
पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर माध्यमांशी बोलताना आमदार देवयानी फरांदे. समवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते. दुसऱ्या छायाचित्रात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना निवेदन देताना देवयानी फरांदे, सतीश कुलकर्णी. आदि~पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर माध्यमांशी बोलताना आमदार देवयानी फरांदे. समवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते. दुसऱ्या छायाचित्रात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना निवेदन देताना देवयानी फरांदे, सतीश कुलकर्णी. आदि