शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

सटाण्यात महिलांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:56 AM

सटाणा : मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि. कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चार महिने उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे गुंतवणूकदारांनी आज दुपारी शहरातून मोर्चा काढून सटाणा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यासमोर एक ...

सटाणा : मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि. कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चार महिने उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे गुंतवणूकदारांनी आज दुपारी शहरातून मोर्चा काढून सटाणा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यासमोर एक तास ठिय्या देऊन पोलीस प्रशासनाविरु द्ध घोषणाबाजी केली.ठेवीदारांनी कंपनीच्या वरिष्ठांकडे चौकशी केली असता व्याजासह पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात येते; मात्र वर्ष दीड वर्ष उलटूनही पैसे न मिळाल्याने शेकडो ठेवीदारांनी सटाणा पोलीस ठाण्यात गेल्या ६ जुलैला कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे (दोघे राहा. विरार, मुंबई) यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मात्र चार महिने उलटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त चारशे ते पाचशे ठेवीदार महिला व पुरुषांनी शुक्रवारी (दि. १३) दुपारी १ वाजता शहरातील शिवाजीमहाराज पुतळ्यापासून मोर्चा काढला. ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने हा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी हल्लाबोल करून पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी मोर्चेकºयांना सामोरे जात मैत्रेय कंपनीने फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून, लवकरच ठेवीदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात राकेश सैंदाणे, महेंद्र अहिरे, प्रशांत शिरोडे, नटराज शिरोडे, जिजाबाई सोनवणे, आशा बागड, ज्योती ठाकरे, कमोदिनी सोनवणे, मीना धामणे, रूपाली धामणे, माधुरी भावसार, ज्योती अहिरे, कुसुम सोनवणे, सविता सोनवणे, सुनंदा जाधव, वंदना अहिरे, उज्ज्वला नेर, सुरेखा देवरे, पुष्पा कोठावदे, रंजना शिरोडे, सुरेखा मेटकर, प्रमिला सोनवणे, शैला मांडगे, रेखा विसपुते, प्रमिला भामरे, सुनीता अमृतकर, शोभा सोनवणे, मनीषा मुंडावरे, प्रभावती साळवे, निशा अहिरे, भारती कदम, सुनीता वाघ आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.