वरखेडा : बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र जिल्हा रुग्णालयाने त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची नोंद केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जुना जानोरी-आडगाव रस्त्यावरील मोतीराम वाघ यांच्या मालकीच्या गट नं. ५३५ च्या हद्दीत सागर मोतीराम वाघ (२५) हा युवक गुरु वारी (दि.१२) संध्याकाळी ७.३० ते ८.०० च्या दरम्यान जेवण आटोपल्यानंतर घराच्या बाहेर रस्त्यालगत फिरत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. यात युवक गंभीर जखमी झाला. सदर युवकाच्या ओठाला बिबट्याने चावा घेतला असून, गळा, हाताची बोटे व इतर ठिकाणी जखमा झाल्या आहेत. जखमी अवस्थेत सागर वाघ यास जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटना आमदार नरहरी झिरवाळ यांना कळविली असता झिरवाळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पंचनामे करण्याबाबत आदेश दिले. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर जिल्हा रु ग्णालयात उपचार करण्यात आलेल्या केस पेपर व प्लॅस्टिक सर्जरीसाठी देण्यात आलेल्या शिफारस पत्रात बिबट्याऐवजी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची नोंद केल्याचे उघड झाले. सदर प्रकार जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातील अधिकाºयांची कानउघडणी करून योग्य ती नोंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले.मदतीपासून वंचित राहण्याची शक्यतासागर मोतीराम वाघ हा युवक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. मात्र बिबट्याऐवजी कुत्र्याच्या हल्ल्याची नोंद करून जिल्हा रुग्णालयाने आपल्या कारभाराचा अजब नमुना सादर केला आहे. वन्यप्राणी हल्ल्यात जखमी झाल्यानंतर शासनाच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते; परंतु कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची नोंद केल्याने शासकीय आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची वेळ या युवकावर येऊ शकते.
हल्ला केला बिबट्याने; नोंद झाली कुत्र्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 1:35 AM
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र जिल्हा रुग्णालयाने त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची नोंद केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयाचा अजब कारभारचुकीची नोंद केल्याचे झाले उघड