नाशिकरोड : मनपाने रहिवासी, व्यावसायिक घरपट्टीत केलेली अवाढव्य करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकरोड विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. मनपाने घरपट्टीमध्ये केलेली अवाढव्य करवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी बिटको चौकातून दुर्गा उद्यान येथील मनपाच्या विभागीय कार्यालयावर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये गजानन शेलार, निवृत्ती आरिंगळे, अंबादास खैरे, संजय खैरनार, नगरसेविका कविता कर्डक, सुषमा पगारे आदी सहभागी झाले होते.आर्थिक बोजामहापालिका विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिवासी, व्यावसायिक, उद्योग क्षेत्रासाठी केलेली घरपट्टीतील आवढव्य वाढ ही अत्यंत चुकीची आहे. व्यापारी व उद्योग मंदीच्या छायेत असतांना मनपाने घरपट्टीत करवाढ करत सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा टाकला आहे. मनपाकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत जिवंत असताना घरपट्टीत वाढ करून नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. स्मार्ट सिटीच्या स्वप्न रंजनासाठी बेसुमार करवाढ करणे चुकीचे असून, घरपट्टीतील करवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राष्टÑवादी कॉँग्रेसचा ‘हल्लाबोल’ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:18 AM