चोरट्यांनी एटीएम मशीनचे ब्यूटिडोअरचे लॉक तोडले. तसेच शटर असेम्ब्ली व डायलर की-पॅड मशीनचे सेफ लॉक तोडून त्यातील रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याने शेजारील तन्मय कॉम्प्युटर्स यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड करून कॅमेऱ्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर घटनेची खबर तातडीने पोलिसांना लागल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरट्याने पलायन केले होते. तोंडावर रूमाल बांधलेला, पाठीवर स्कूल बॅग लटकवलेला सदर चोरटा बँक यंत्रणेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ईपीएस कंपनी, मुंबई यांचे चॅनल मॅनेजर सागर बाळू कदम (सोमठाणदेश, ता. येवला) यांनी घटनेबाबत अभोणा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दीपक बागुल यांचे मार्गदर्शनाने पोलीस हवालदार एन. एम. गांगोडे, एस. बी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
फोटो- ३० अभाेणा एटीएम/१
300721\30nsk_34_30072021_13.jpg~300721\30nsk_35_30072021_13.jpg
फोटो- ३० अभाेणा एटीएम/१~फोटो- ३० अभाेणा एटीएम १