शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

‘पबजी गेम’च्या व्यसनामुळे मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:59 AM

युवकांना वेड लावणाऱ्या पबजी व्हिडिओ गेमचे लोन नाशिकमध्येही चांगलेच पसरले असून, अनेक तरुण तासनतास या गेममुळे मोबाइलमध्येच डोके घालून बसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते. हाच गेम खेळताना आईने मोबाइल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात एका चौदा वर्षीय मुलाने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे शुक्रवारी (दि. १५) घडली

ठळक मुद्देविषारी औषधाचे सेवन : आईने मोबाइल काढून घेतलाचा राग

सातपूर : युवकांना वेड लावणाऱ्या पबजी व्हिडिओ गेमचे लोन नाशिकमध्येही चांगलेच पसरले असून, अनेक तरुण तासनतास या गेममुळे मोबाइलमध्येच डोके घालून बसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते. हाच गेम खेळताना आईने मोबाइल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात एका चौदा वर्षीय मुलाने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे शुक्रवारी (दि. १५) घडली असून, आकाश महेंद्र ओस्तवाल (१४) असे या युवकाचे नाव आहे.सातपूरमधील शिवाजीनगर येथील आकाश महेंद्र ओस्तवाल हा सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या आईच्या मोबाइलमध्ये पबजी गेम खेळत होता.त्याचवेळी चांदवड येथे होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीने आईसोबत बोलण्यासाठी फोन केला. आईने आकाशच्या हातातून मोबाइल घेतला. गेम खेळतांना लेव्हल अपूर्ण राहिल्याचा राग आल्याने त्याने घराबाहेर पडून अज्ञात ठिकाणावरून ‘डेल्टा मैत्रिग’ प्रकाराचे विषारी औषध आणून, ते घरामध्ये प्राशन केले. त्यामुळे त्याला उलट्या होऊ लागल्या व तो बेशुद्ध पडल्याने त्याला शिवाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल केले. त्याची अवस्था गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला ७२ तासांच्या निगराणीखाली ठेवले आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPUBG Gameपबजी गेम