शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:33 AM

जयभवानीरोड मनोहर गार्डन येथे १३ वर्षांच्या मुलाला अज्ञात दोन-तीन इसमांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देनशिबाची साथ ; महिलेचे प्रसंगावधान; घटनास्थळावरून चोरटे फरार

नाशिकरोड : जयभवानीरोड मनोहर गार्डन येथे १३ वर्षांच्या मुलाला अज्ञात दोन-तीन इसमांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.जयभवानीरोड मनोहर गार्डन मीना बंगला येथे राहणाऱ्या अमोद यशवंत केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा १३ वर्षांचा मुलगा अथर्व हा सेंट झेवियर्स शाळेत ७वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याला शाळेत जाण्या-येण्यासाठी खासगी व्हॅन लावली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अथर्व याला व्हॅनचालकाने बंगल्याच्या रस्त्यावर सोडले.यावेळी घराजवळ उभ्या असलेल्या एका अनोळखी कारमध्ये दोन-तीन इसम होते. अथर्व हा बंगल्यामध्ये जात असताना त्यातील एका इसमाने कारमधून उतरून कोरी वही दाखवत पत्ता विचारण्याचा बहाणा करून अथर्वचा हात पकडून बळजबरीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र अथर्वने त्याला विरोध करत हिसका दिल्याने अथर्व खाली पडला.सुदैवाने याचवेळी अथर्व याच्या घरी काम करणारी आशाबाई आहेर या तेथे आल्या असता त्यांना बघून कारमधील इसम पळून गेले. अथर्व याचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.केतकर यांच्या घराजवळ राहणारे कलानी यांच्याबंगल्याच्या गेटवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासले असता धक्कादायक दृश्य समोर आले आहे. मुलाच्या अपहरणाच्या इराद्यानेच संशयितांच्या हालचाली असल्याचे कॅमेºयात कैदझाल्या आहे.अपहरणाच्या घटनेमुळे परिसर हादरलाअपहरणाच्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अपहरणकर्त्यांनी निवडलेली वेळ, उभे केलेले वाहन आणि पळून जाण्यासाठी निवडलेला मार्ग यावरून अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे नियोजन केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपहरण करण्याचा प्रयत्न का करण्यात आला असावा, याबाबत चर्चा सुरू असून, परिसर मात्र घटनेने हादरला आहे.अपहरणकर्त्यांचा सापळासाडेनऊ वाजेपासून एक अज्ञात नंबरची कार बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर उभी होती. सकाळी १०.२७ च्या सुमारास संबंधित कारचालकाने कार रिव्हर्समध्ये घेऊन केतकर यांच्या मीना बंगल्याच्या रस्त्यावर चालूस्थितीत उभी करून ठेवली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले.प्रयत्न फसलाअथर्व याला पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर संशयित कार सुसाट वेगाने निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फुटेजमधून उघड झालेल्या काही बाबी अद्याप स्पष्ट करण्यात आल्या नाहीत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी