नाशिकरोड : येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदिवानाने संचित रजा नामंजूर झाल्यामुळे बुधवारी (दि.२१) मध्यरात्री उशिरा सॅनिटायझरसदृश द्रवरुप पदार्थ सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कारागृह प्रशासनाच्या वेळीच लक्षात येताच त्यांनी बंदी अविनाश अशोक जाधव (३०) यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सर्कल ७/८ मधील कैदी अविनाश हा यापूर्वी संचित रजा दिल्यावर पुन्हा स्वतःहून हजर झाला नव्हता. पोलिसांनी त्याला पकडून कारागृहात दाखल केले होते. अविनाश याने पुन्हा कारागृह प्रशासनाकडे संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्याचा यापूर्वीचा अनुभव बघता कारागृह प्रशासनाने तो अर्ज नामंजूर केला होता. त्याचा राग बाळगून अविनाश याने बुधवारी मध्यरात्री कारागृहात सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारागृह प्रशासनाने त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दवाखाना नोंद करण्यात आली असून कारागृह प्रशासनाकडून गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
कैद्याचा सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 1:10 AM
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदिवानाने संचित रजा नामंजूर झाल्यामुळे बुधवारी (दि.२१) मध्यरात्री उशिरा सॅनिटायझरसदृश द्रवरुप पदार्थ सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देसंचित रजा नामंजूर केल्याचे कारण