सातपूर : मुंबई, पुणे आणि नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. महामार्ग, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग या सेवाही उपलब्ध असल्याने परदेशातील स्थलांतरित उद्योगांना नाशिकला आकर्षित करावेत, असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रधान सचिव भूषण गगराणी यांना घातले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील विशेषत: चीनमधील अनेक कंपन्या स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. सदर उद्योगांना महाराष्टÑाकडे आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित केलेली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली निमाचे संदीप भदाणे, राजेश गडाख यांसह पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव भूषण गगराणी यांची भेट घेतली.औद्योगिकीकरणासाठी अत्यावश्यक असलेले सर्वच घटक जिल्ह्यात असून, पोषक वातावरण असल्याने स्थलांतराच्या विचारात असलेल्या परदेशातील कंपन्यांना नाशिकमध्ये उद्योग थाटण्यासाठी प्रयत्न करावेत. अॅटोमोबाईल,अन्नप्रक्रि या प्रकल्प, शेती, मेडिसीन, इलेक्ट्रीकल तसेच संरक्षण सामग्री आदी सेक्टरच्या निगडित आजमितीस सुमारे पंधरा हजार लघू आणि मध्यम दर्जाचे तर तीनशे मोठे प्रकल्प जिल्ह्यात कार्यरत आहेत. नवीन प्रकल्पासांठी सुमारे दहा हजार हेक्टर जमीन उपलब्ध होऊ शकते. शिवाय वाइनरीची राजधानी म्हणून नाशिकची ओळख होऊ लागली आहे. आता शैक्षणिक हबही झाले आहे. विविध सोयीसुविधा, उपयुक्त वातावरण आणि पोषक वातावरण या जमेच्या बाबींमुळे बॉश, सिमेन्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मायलन, ग्लेनमार्क,एबीबी, एल अॅड टी, इपीसी, क्र ॉम्प्टन ग्रीव्हज आदी मोठ्या समूहाच्या कंपन्यांनी औद्योगिक वसाहत भक्कम केलेली आहे, अशीही माहिती यावेळी खासदार गोडसे यांनी देसाई यांना दिली.----------------------------नाशिकला पसंती४ औद्योगिकीकरणासाठीनाशिक जिल्ह्यातील वातावरण उत्तम असल्याने स्थलांतरित उद्योगासाठी नाशिकचे नाव पसंतीवरच आहे. त्यामुळेनवीन गुंतवणुकीसाठी नाशिकचा नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली.
स्थलांतरित उद्योगांना आकर्षित करण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:30 PM