शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सटाण्याला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 4:38 PM

पहाटेची घटना : ३६ लाखांची रोकड वाचली

ठळक मुद्देबुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये घुसून सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमे-याचे कनेक्शन कापून टाकले.

सटाणा : शहरातील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले एसबीआयचे एटीएम बुधवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न फसल्याने सुमारे ३६ लाख रुपयांची लूट टळली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सदर प्रकार पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला.शहरातील नामपूर रस्त्यावरील वन विभागाच्या वसाहती समोरील एसबीआयच्या एटीएम मध्ये मंगळवारी (दि.२०) दुपारी एका मशीन मध्ये ३० लाख ९ हजार ८०० तर व दुसऱ्या मशीनमध्ये ५ लाख ९१ हजार ९०० रु पयांची रोकड टाकण्यात आली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये घुसून सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमे-याचे कनेक्शन कापून टाकले. त्यानंतर कटरने मशीन फोडण्याचा प्रयत्न करत असतांना गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजल्याने त्यांनी पोबारा केला. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी परिसरात गस्त घालत असल्यामुळे ते पहाटे साडेचार वाजता हजेरी पुस्तकावर नोंद करण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. तेव्हा हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तत्काळ श्वानपथकला पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नामदेव खैरनार, पवार आणि बहिरम यांनी जाऊन घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी रोकड लुटण्यासाठी वाहनाचा वापर केला असावा असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकatmएटीएम