लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांकडे करत न्याय मिळत नसल्याने तसेच संशयिताच्या अटकेच्या मागणीसाठी सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या पित्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार (दि. २३) घडली.अत्याचारप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी लासलगावमधील दांपत्य मागील सात दिवसांपासून नाशकात उपोषणाला बसले आहेत. मात्र, दखल घेतली जात नसल्याने पीडितेच्या पित्याने सोमवारी संध्याकाळी स्वत:च्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका, सरकारवाडा पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत पाहणी केली. यावेळी शुद्धीत आलेल्या पित्याने आपत्कालीन कक्षातून हाताची सलाइन काढून फेकत कक्षाबाहेर धाव घेत भिंतीवर डोके आपटून घेतले. (पान ४ वर) रिक्षाचालक धावले‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना त्वरित अटक करा’, अशी या कुटुंबाची प्रमुख मागणी आहे. पीडितेच्या पित्याने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जवळच्या रिक्षाथांब्यावरील रिक्षाचालकांनी त्यास तत्काळ रिक्षात टाकून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पित्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पीडितेच्या उपोषणकर्त्या पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:46 AM
नाशिक : आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांकडे करत न्याय मिळत नसल्याने तसेच संशयिताच्या अटकेच्या मागणीसाठी सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या पित्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार (दि. २३) घडली.
ठळक मुद्देप्रकृती स्थिर : जिल्हा रुग्णालयात गोंधळ