शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गंगापूररोडवर खड्डे बुजविण्याचा प्रयत्न कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:23 PM

पावसाळा उलटून तीन महिने झाले तरी अद्याप गंगापूररोड परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असून, महापालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गंगापूर गाव परिसर, गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहनचालक त्रस्त; अपघातांत वाढ

गंगापूर : पावसाळा उलटून तीन महिने झाले तरी अद्याप गंगापूररोड परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असून, महापालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गंगापूर गाव परिसर, गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे. या खड्ड्यांपासून वाहनधारकांची सुटका व्हावी, याकरिता तात्पुरती मलमपट्टीही करण्यात आली. अनेक ठिकाणी खडीचा चुरा टाकण्यात आला. विटांचे तुकडे टाकूनही खड्डे बुजविण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून करण्यात आला. परंतु, ही मलमपट्टी कुचकामी ठरत असून, पुन्हा या खड्ड्यांची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे या खड्ड्यांवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी केली आहे. संभाजी चौक, सिबल हॉटेल, विसे मळा, कृषिनगर, एबीबी सर्कल, कृषिनगर ते शरणपूर पोलीस चौकी या परिसरातही वाहनधारकांना रस्त्यांवरील खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या परिस्थितीत दुचाकी व चारचाकी वाहनांसह रिक्षावाले या रस्त्याला अक्षरश: वैतागले आहेत. नागरिकांना चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच वाहने चालवावी लागत असून, त्यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.खड्डेच खड्डे चोहीकडे अशी सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांची स्थिती असून, या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून त्यांच्यावर वारंवार मलमपट्टी म्हणून हलक्या दर्जाच्या डांबराचे पट्टे मारण्यात आले आहेगंगापूर रोडवर व रस्त्याच्या मधल्या बाजूला असलेल्या कॉलनी रस्त्यांवर तात्पुरते काम करून खड्डे बुजवले, मात्र काही दिवसातंच ते पुन्हा उखडल्याने रस्त्यांवर वाहन चालवणे अवघड झाले आहे.- जयेश आगरकर, नागरिक

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा