नाशिक : करवाढीला भाजपाचे समर्थन आहे का, महासभेत भाजपा करवाढीच्या विषयाच्या बगल देऊन पळ का काढत आहे, त्याचबरोबर आता कुठे गेला महापौरांचा दुर्गावतार, हाच भाजपाचा पारदर्शी कारभार म्हणायचा काय, मुंढेंना करवाढीच्या मुद्द्यावर घालवले, मग आत्ताच्या आयुक्तांशी सेटलमेंट झाली काय? असा प्रश्न भाजपाच्या युती मित्र शिवसेनेसह अन्य विरोधीपक्षांनी विचारला आहे. करवाढ झालीच पाहिजे या प्रशासनाच्या भूमिकेमागे भाजपाच असून, त्यांना आगामी निवडणुकीत नाशिककर दणका देतील, असे मतही विरोधकांनी व्यक्त केले.कुठे गेला महापौरांचा दुर्गावतार?तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत झालेल्या महासभेत दुर्गावतार धारण करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांना आता काय झाले आता त्या दुर्गावतार का धारण करीत नाहीत? असा प्रश्न सत्यभामा गाडेकर यांनी केला. दुर्गावतार केवळ सोयीनेच असतो काय? असा प्रश्नही त्यांनी केला.गंभीर विषय टाळण्यासाठीच कामकाज संपवलेतपोवनातील शेतजमिनी साधुग्रामच्या नावाखाली घेऊन त्यात बस डेपो बांधायचे, खासगी कंपनीला महापालिका हद्दीत गॅस आणण्यासाठी साइडपट्ट्यांचे जुजबी काम करून घेणे असे अनेक वादग्रस्त विषय असल्याने सत्तारूढ भाजपानिमित्त करून सभा गुंडाळली. करवाढीचा मुद्दा कायम असून, ४ तारखेला न्यायालयात चुकीच्या कामकाजाचे फलित मिळेलच, असा आरोप अपक्ष गटनेता गुरुमितसिंग बग्गा यांनी उपस्थित केला आहे.
करवाढीमुळे भाजपाचा तोंड लपविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:25 AM