अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते. झिरवाळ यांनी सांगितले, तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असून तेथे स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी कुशल कामगार तयार करण्यासाठी कादवा कारखान्यावर एक आयटीआय व्हावे यासाठी प्रयत्न आहे तसेच नर्सिंग कॉलेजची प्रवेश क्षमता वाढवली जाईल. तालुक्यातील सर्व रस्त्यांच्या सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले, केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालवणे शक्य नाही. म्हणूनच केंद्र सरकारने इथेनॉल साठी प्रोत्साहन दिले आहे व कादवा नेही हा प्रकल्प हाती घेतला आहे. कारखान्याला त्यासाठी आणखी निधीची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, माजी संचालक संजय पडोळ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष उत्तम भालेराव, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक हेमंत माने, कार्यलक्षी संचालक दत्तात्रय वाघचौरे, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जि.प. सदस्य भास्कर भगरे आदीसह सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक बाळासाहेब जाधव यांनी केले.
इन्फो
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव
मार्चअखेर दरम्यान कारखाना क्षेत्रातील सर्व ऊस तोडला जाणार असून कादवा कोणतेही उप पदार्थ निर्मिती नसताना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत आहे. आज ऊस हे एकमेव शाश्वत भाव मिळणारे व परवडणारे पीक असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लावावा, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले आहे.
फोटो- ०६ कादवा-१
कादवा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ. समवेत चेअरमन श्रीराम शेटे यांचेसह संचालक मंडळ.
===Photopath===
060321\06nsk_46_06032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०६ कादवा-१कादवा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या भुूमिपूजनप्रसंगी बोलताना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ. समवेत चेअरमन श्रीराम शेटे यांचेसह संचालक मंडळ.