नाशिकरोड : सिन्नर फाटा येथे शाळेतून पायी घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मूकबधिर विद्यार्थिनीचे बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न एका जागरूक युवकाच्या सतर्कतेने फसला. युवकाने मुलीचे अपहरण करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वारासोबत झटापट करून शाळकरी विद्यार्थिनीची सुटका केली.सिन्नर फाटा भागात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मूकबधिर विद्यार्थिनी दत्तमंदिररोड विकास मतिमंद शाळेत शिकते. सोमवारी (दि.१०) शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पाच वाजता शाळेच्या बसमधून नेहमीप्रमाणे सिन्नर फाटा येथे उतरली. ती रस्त्याने घरी पायी जात असताना मारु ती मंदिरामागे पल्सर दुचाकीवर आलेल्या मद्यधुंद युवकाने या विद्यार्थिनीची छेड काढत बळजबरीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला.यावेळी विद्यार्थिनीने मद्याच्या नशेत असलेल्या युवकाच्या हाताला हिसके देत त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत आरडाओरड केल्याने जवळच असलेल्या इरफान शेख नावाच्या तरुणाचे लक्ष वेधले गेले. त्याने तत्काळ धाव घेत विद्यार्थिनीला त्या युवकाच्या हातातून सोडविले. यावेळी संशयित युवकाने दुचाकी सोडून देत पलायन करताना इरफानला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर इरफान याने माजी नगरसेवक शिवाजी भागवत, अन्वर मणियार यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ भेदरलेल्या विद्यार्थिनीला सावरत दिलासादिला. यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांची भेट घेऊन घडलेला प्रकार कथन केला.अवघ्या काही वेळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी तपासाची चक्रे फिरवून मुलीला पालकांच्या स्वाधीन तर केलेच शिवाय संशयित अपहरणकर्त्या युवकालाही त्वरित अटक केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मूकबधिर मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:23 AM
सिन्नर फाटा येथे शाळेतून पायी घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मूकबधिर विद्यार्थिनीचे बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न एका जागरूक युवकाच्या सतर्कतेने फसला. युवकाने मुलीचे अपहरण करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वारासोबत झटापट करून शाळकरी विद्यार्थिनीची सुटका केली.
ठळक मुद्देयुवकाची सतर्क ता : संशयितास घेतले ताब्यात