लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या काळात होणारा मद्याचा वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुजरात राज्यातून येणाºया मद्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे डांग आणि बलसाड येथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार सीमारेषांवरील गस्त अधिक कठोर करण्याचा निर्णय तेथील जिल्हाधिकाºयांनी घेतला आहे, तर महाराष्टÑातील चेकपोस्टवरील पथकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निवडणुकीत मद्याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीत परराज्यात स्वस्तात मिळणाºया मद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ६५ भरारी पथके तैनात करण्यात आली असून, अवैध वाहतूक रोखण्यासाठीचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या आदेशानुसार मद्यविक्री दुकानामध्ये सीसीटीव्हीदेखील लावण्यात आलेले आहेत.मद्याच्या खरेदी-विक्रीवर संपूर्णपणे देखरेख केली जात असताना अवैध मार्गाने परराज्यातून शहरात मद्य आणले जात असल्याचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मांढरे यांनी बॉर्डर मीटिंग आयोजित केली होती. मंगळवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये डांग आणि बलसाड येथील जिल्हाधिकाºयांशी त्यांची चर्चा केली. गुजरात राज्याच्या सीमारेषांवरून जिल्ह्यात अवैध मद्याची वाहतूक केली जाते. निवडणुकीत यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे सीमारेषांवरून होणारी वाहतूक यावर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या उभयतांमध्ये चर्चा झाली. गुजरातमधून नाशिक जिल्ह्यात येणाºया मार्गांवर वनविभाग तसेच पोलिसांचेदेखील चेकपोस्ट आहेत. याबरोबरच निवडणुकीच्या निमित्ताने बॉर्डरवरील संयुक्त गस्त तसेच चेकपोस्ट गस्त यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.निवडणुकीत मद्याचा वापर रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून, जिल्हा यंत्रणा सतर्क असल्याचे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
परराज्यातून येणारा मद्यसाठा रोखण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 1:11 AM
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या काळात होणारा मद्याचा वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुजरात राज्यातून येणाºया मद्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे डांग आणि बलसाड येथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार सीमारेषांवरील गस्त अधिक कठोर करण्याचा निर्णय तेथील जिल्हाधिकाºयांनी घेतला आहे, तर महाराष्टÑातील चेकपोस्टवरील पथकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देबॉर्डर मीटिंग : जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स