सिन्नर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत रस्त्यांची कामे बजेटमध्ये ज्यावर्षी मंजूर केली, त्या वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे विरोधक जुने मंजुरीचे पत्र दाखवून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा करीत असलेला खटाटोप हास्यास्पद असल्याचा टोला आमदार माणिकराव कोकाटे यांनी लगावला.
कोकाटे यांच्या प्रयत्नातून महत्त्वाच्या ९ रस्त्यांसाठी सुमारे ११ कोटींचा निधी प्राप्त झाला. या कामांचा शुभारंभ कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर दोडी येथे आमदार कोकाटे बोलत होते. त्यानंतर दुपारी कोकाटे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या हस्ते सिन्नर प्रशासकीय इमारत फर्निचर व इतर कामे, डॉक्टर संघटना हॉलच्या आनुषंगिक कामे या कामांसह सिन्नर शहरातील विविध रस्त्यांची कामे, गटारकामे, डांबरीकरण यांच्यासह सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. शनिवारी दिवसभरात सुमारे १५ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव शेळके, उपसभापती संजय खैरनार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, अॅड. राजेंद्र चव्हाणके, शशिकांत गाडे, सुनील नाईक, सुदाम बोडके, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, नगरपालिकेचे गटनेते नामदेव लोंढे, शीतल कानडी, चंद्रकांत वरंदळ, बापू गोजरे, मल्लू पाबळे, रामभाऊ लोणारे, सुहास गोजरे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी- ११ कोकाटे
110721\11nsk_20_11072021_13.jpg
विकासकामे