दिंडोरी : राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्रीबच्चू कडू यांनी राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समिती व प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले.शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यासह विविध मागण्यांसाठी शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राज्यातील सहकारी संस्थांची माहिती घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कडू यांनी दिल्याची माहिती संघर्ष समितीचे सदू गावित व प्रहार जनशक्ती पक्षाचे दिंडोरी तालुकाप्रमुख सुकदेव खुर्दळ यांनी दिली.राज्य शासनाने २००६-०७ मध्ये अल्पभूधारक शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी केली होती, मात्र त्यावेळी ती झाली नव्हती. कर्जमाफी व्हावी म्हणून २००८ पासून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच नुकत्याच करण्यात आलेल्या सन २०१९ च्या कर्जमाफी योजनेचाही लाभ शेतकºयांना झाला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी संस्था संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास बोरसे, नारायण तुंगार, विठोबा जाधव, रमेश झिरवाळ, तुकाराम महाले, सुदाम तुंगार, रतन गायकवाड, प्रकाश महाले आदी उपस्थित होते.
आदिवासी संस्थेच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 9:39 PM
राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समिती व प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले.
ठळक मुद्देबच्चू कडू : प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन