शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

इच्छुकांच्या गाठीभेटींना आला वेग

By admin | Published: January 05, 2017 11:27 PM

राजकीय ‘उष्मा’ वाढला : नववर्षाच्या शुभेच्छांवर अजूनही भर

 रमेश देसले ठेंगोडाआगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गटात मतदारांच्या गाठीभेटी घेत आपणच उमेदवारीसाठी कसे योग्य आहोत हे पटवून देत जंग जंग पछाडत गटातील राजकीय वातावरण ऐन थंडीच्या मोसमातही गरम झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच नववर्षाच्या निमित्ताने जनतेसमोर जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गटातील गावागावांत नववर्षाच्या शुभेच्छांचे बॅनर लावत, तर काहींनी सोशल मीडियाच्या (व्हॉट्सअ‍ॅप) माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. अंदाजे ४० हजार लोकसंख्या असलेल्या ठेंगोडा गटाची मतदार संख्या २८,५०० आहे. जिल्हा परिषद गटात मुंजवाड व ठेंगोडा हे दोन गण येतात. ठेंगोडा गणाची मतदार संख्या १३,००० व मुंजवाड गणाची मतदार संख्या १४,५०० इतकी आहे .२००५ च्या निवडणुकीत ठेंगोडा गट आरक्षित झाल्याने त्यांनी नवख्या असलेल्या वीरगाव गटात आपल्या सौभाग्यवती संगीता पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन निवडून आणले होते. राजकीय वजनामुळे पहिल्यांदाच निवडून येऊनदेखील संगीता पाटील यांना जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापतिपद मिळाले होते. त्यानंतर झालेल्या २०११ च्या निवडणुकीत यशवंत पाटील यांना वीरगाव व ठेंगोडा दोन्ही गट उमेदवारीसाठी खुले झाल्याने त्यांनी स्वगृही म्हणजे आपला हक्काचा गट म्हणून ठेंगोडा गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे यशवंत पाटील, राष्ट्रवादीचे शैलेश सूर्यवंशी, शिवसेनेचे अ‍ॅड. वसंत सोनवणे, मनसेचे सुरेश मोरे अशी चौरंगी लढत झाली होती. या लढाईत यशवंत पाटील यांच्या सौभाग्यवती व माजी महिला बालकल्याण सभापती संगीता पाटील, विद्यमान जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्या पत्नी हेमलता सूर्यवंशी, शिवसेनेचे उमेदवार असलेले अ‍ॅड. वसंत सोनवणे यांच्या पत्नी व माजी पं. स. सदस्य संगीता सोनवणे व मनसेचे उमेदवार राहिलेले सुरेश मोरे यांच्या पत्नी मीनाताई मोरे यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. पाटील यांनी त्यादृष्टीने गटात संपर्क वाढवत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याने चौरंगी वाटत असलेली ही निवडणूक पंचरंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र यशवंत पाटील व प्रा. अनिल पाटील हे दोन्ही काँग्रेस पक्षाचे असल्याने पक्ष कुणाला अधिकृत उमेदवारी देणार याबाबत गटात चर्चा रंगत आहे.