नाशिक : दिंडारी तालुक्यातील वणी पोलिस स्टेशनमध्ये पेठ येथील एक वेठबिगार मजूराची बागायतदाराने केलेल्या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यानी त्याची तक्रार दाखल न करता कायद्याचचे पालन न केल्याने संबंधित अधिका-याविरुद्ध तातडीने शिस्तभंगाचा कारवाई करण्यासाठी गुरुवारी (दि. १६) श्रमजीवी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दिंडोरी येथील एक दाक्ष बागायतदाराकडे पेठ येथील एक मजुर व त्यांचे कुटुंबाने बागायतादाराकडून काही आगऊ रक्कम घेतील होती. मात्र बागायतदाराने हिशोबाच्या वेळी त्यांच्याकडे अतिरिक्त रक्कम थकित काढून त्याच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. तसेच घोटी येथील एका वीटभट्टी मजूराकडून तो आजरी असताना अमानुषपणे मारहाण करुन काम करुन घेतले. त्याचा गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे अशा शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चासाठी जिल्हाभरातुन मोठ्या प्रमाणावर आदीवासी बांधव उपस्थित होते. मोर्चा ईदगाह मैदान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर काढून शिस्तभंग करण्याºया पोलिस अधिकाºयांचा निषेध करण्यात आला. मोर्चामध्ये अनेकांनी विविध घोषणांचे फलक घेऊन व पोलिस प्रशासनाविरुद्ध विविध घोषणा दिल्या. यानंतर आंबेडकर पुतळा येथे जमा होत विविध गीतांच्या व घोषणांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकारी यांना याविषयी निवेदन देवुन संबधित अधिकाºयांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी श्रमजीवी संघटेनेचे संस्थापक विवेक पंडित, अध्यक्ष राम वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, रामराव
श्रमजीवी संघटनेच्या मोर्चाने वेधले प्रशासनाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 2:51 PM
गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला
ठळक मुद्दे श्रमजीवी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोर्चाचे आयोजन मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी संबधित अधिकाºयांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी