निवेदन : विभागीय आयुक्त गमे यांच्याकडे केली तक्रार
नाशिक : लसीकरणासाठी सर्वत्र रांगा लागत असल्याने त्यातून संक्रमणाचा धोका देखील असतो. यातच शारीरिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांगांना धोका अधिक होण्याची शक्यता असते. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांची परवड होत असल्याच्या प्रश्नाकडे नगरसेवक जगदीश पवार यांनी विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगांना लसीकरण, उपचार आणि चाचणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने, रांगेत उभ्या राहणाऱ्या दिव्यांगांना गर्दीमुळे परतावे लागत आहे. अनेक दिव्यांग बांधव गर्दीत उभे राहतात. परंतु त्यांना अनेकदा माघारी जावे लागते. काहींना रांगेत उभे राहणे शक्य नसते. काहींची तासन् तास उभे राहण्याची क्षमता नसते. त्यांना अनेक निर्बंध येतात. त्यामुळे दिव्यांग बांधव लसीकरणापासून वंचित आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पवार यांनी निवेदनात केली आहे.
दरम्यान, लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, केंद्र नियमित सुरू राहण्याबाबतचे नियोजन करावे, केंद्रांवर व्हॅक्सिनचे डोस वाढवून देण्यात यावेत, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी लसीकरण केंद्रच नाही, तरी अशा ठिकाणी लवकरात लवकर केंद्रे सुरू करण्यात यावीत, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
दिव्यांगांना विशेष प्राधान्य व लसीकरण नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची तसेच विहित पद्धतीची अनिवार्यता करावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
(फोटो: कॅप्शन:
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देताना नगरसेवक जगदीश पवार.)
===Photopath===
180521\18nsk_8_18052021_13.jpg
===Caption===
विभागीय आयुक्ता राधाकृष्ण गमे यांना निवेदन देतांना नगरस्ेवक जगदीश पवार